"

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Kavita on Love | Marathi Kavita for Love | मराठी कविता प्रेम

Marathi Kavita Prem | प्रेमावरील मराठी कविता


ह्या पोस्टद्वारे मी तुमच्या समोर मराठी प्रेम कविता marathi kavita prem चा संग्रह घेऊन आलो आहे. तुम्हाला प्रेमावरील कविता marathi kavita on love नक्की आवडतील. तुमच्या मानतील प्रेम भावना चांगल्या शब्दात मांडायला या marathi kavita for love नक्कीच उपयोगाला येतील.


Marathi-kavita-prem


मराठी प्रेम कविता- आठवणी तुझ्या


आठवणीत तूझ्या, काळ खूप लोटला.
दुःखाने माझा वाटा, इमाने इतबारे वाटला.
वाटणी झाली आयुष्याची, पर्वा नव्हती कधी जगाची.
साथ सोड्शिल अर्ध्यावरती, एवढी घाई काय सुटण्याची.

सोडलं तर खर मग, काळजीचा सूर का लावतेस.
अधून मधून तिसऱ्या वाटेला, तूच तर मला पावतेस.

तक्रार नाही कोणाची, कदाचित तस व्हायचच असेल.
विधिलिखित वाणीमध्ये, आपला शेवट एकत्र नसेल.

शेवट दोघांचाही होनार, कारने लागतील कित्येक.
काळ जरी विरत गेला तरी, आठवण सांभाळली प्रत्येक.

सगळे हिशोब तू केलेस, बाकी काही शिल्लक नाही.
आयुष्याचा व्यवहार केलास तू, सुखांचा जमाखर्चच उरला नाही.


marathi kavita on love- रे थांब पावसारे थांब पावसा, थांब जरा ।
येऊ देत माझ्या प्रियकरा ॥
झेप घेऊनी नभातूनी ।
तू तृषविलीस रे वसुंधरा ।
भेटे जरी प्रियकर तिला ।
कोरडाच माझा उंबरा ॥
रे थांब पावसा, थांब जरा ।
येऊ देत माझ्या प्रियकरा ॥
विराण जीवा लागे झुरणी ।
ही केलीस रे कैसी करणी ।
रे शांतवाया मम मना ।
आवरी तू आपुल्या शतधारा ॥
रे थांब पावसा, थांब जरा ।
येऊ देत माझ्या प्रियकरा ॥
येईल तो जेव्हा घरा ।
सरिता मिळेल ही सागरा ।
आवरू नको प्रीतीचा झरा ।
तू बरस, बरस रे युगांतरा ॥
पण थांब पावसा थांब जरा । 
येऊ देत माझ्या प्रियकरा ॥


मराठी कविता -प्रेम


इथे रक्ताळलेला ।
स्मरणाच्या अनंत मरणं जगून
दे विस्मृतीचा, क्षणिक विसावा ।
ऐक त्या हाका माळरानाच्या,
दरी दरीतुन ओ देणाऱ्या ।
हास्यध्वनी तुझे निनादी
गाबुळल्या जांभूळी
वैशाख वणवा
सावली धरी ।
कितीदा वेचला मोगरा
मंदगंध सोनचाफा
मांडव बोलघेवडा
वेणी चंद्रमोरी
अजून ती।
स्पर्श हूर हूर, अबोल गाणे
रातराणी का रुसली, कोण जाणें।
प्राजक्त दरवळे, तिन्हीसांजे
दिनरात्र मिलनासवें।
रात्र बहरली आठवणी उगाळी
डोळ्याची ताटी सताड उघडी ।
विनवणी देवी हात जोडुनी
स्मृतीच्या अभिशापाला
विस्मृतीचा उ:शाप मिळोनि ।


marathi kavita prem- गीत ते हरवलेलेेगीत ते हरवलेलेे,
स्वर मुके मुके
धूसर त्या आठवणी,
शब्द शब्द रीते
चिंब चिंब ओली रात्र,
आसू असू म्हणे
आरक्त हात तुझे,
ओंजळीत नक्षत्रांचे ताटवे
छंद छंद उन्मत्त,
तृप्त रंध्र रंध्र
धुंद पहाट गुलछबी
श्वास श्वास यौवनगंधी
कर्म कर्म अखंड,
नश्वर नश्वर शतखंडी
निमाले तरू अखेरी,
आदित्यचक्षु पैलतिरी

marathi kavita on love-वेड लावतेस माझ्या मनाला तूदिवस सरतो नि येते रात
मंद चांदण्याची ही रात
मज हळूच कानात येऊन
सांगते तुझे रूप किती देखणे
हे प्रिये, आज चंद्रही रूप तुझे बघुनी
हळूच लाजला आहे
इतकी देखणी दिसतेस तू
चंद्राला पण लाजवणे तुला भाग पडले
रूप तुझे हे लोचनी 
 ना हटत नजर तुझ्यावरी
भाळलो मी रूप तुझे पाहुनी
ही चांदणीपण लाजली तुझे रूप पाहुनी
लावलेस जीव तू माझ्या परी
वेडापिसा झालो मी तुला पाहण्यासाठी
वाटत ही रात संपूच नाही
तुझ्या मिठीतच राहून रात हि सरली
इतके देखणे रूप तुझे
स्वप्नातही न सोडवे मला हे रूप तुझे
खरच इतकी देखणी दिसतेस तू
वेड लावतेस माझ्या मनाला तू


मराठी कविता -प्रेमसख्या नातं तुझं नि माझं अखंड स्वप्न 
जणू मोगऱ्याचा असावा सुगंधी गजरा... 
केसात ओवते मी हौशीने नि तू म्हणतो 
खुलून दिसतो तुझा मुखडा साजरा... 
आता तू नाहीस ना रे सख्या सोबत माझ्या
तरी सतत देत असताे तो मला आठवण... 
खंड पडू देत नाही मी आपल्या नात्याला 
मी पुन्हा नव्याने करत राहते साठवण... 
तुला माझ्या येण्याची चाहूल द्यायला 
गजरा नि माझ्या पैंजणांचा आवाज... 
तू आतुर असायचा घ्यायला आस्वाद 
हरखून जायचास पाहून माझा साज... 
तू तासनतास काढायचास देखणे चित्र 
मी ओवलेल्या गजऱ्यातल्या देखाव्याचे... 
त्यासाठी घरभर मिरवत फिरवायचा सुगंध 
मग मलाही असायचे कुतूहल पाहण्याचे... 
तुझ्या आठवणींचा आठवणीने माळते 
मी दररोज मोगऱ्याचा भरगच्च गजरा... 
या आशेवर की तू एकदा परत येशील 
नि कुजबुजशील किती सुंदर तुझा नखरा... marathi kavita prem-प्रेम भावना
धीर एकवटून त्याने विचारले तिजला 
तुझ्या डोळ्यातले भाव सांग ना मजला 
छळणारी ती नजर तुझी स्वस्थ नाही बसवत 
एकटेपणात तूला आठवून ठेवते मला हसवत 
धडधडत काळीज तूला एकटक पाहताना 
काही सुचतच नाही तू समोरून जाताना 
नाही राहीलो काॅलेजकुमार तरीही कळ उठते 
न बोलता तुझ्या प्रेमाची भावना मनी दाटते  
खोलवर कुठेतरी दडलेला एक कप्पा तुझा 
एकटेपणात मात्र असतो तो फक्त माझा 
तुझं हसण तुझं बोलणं साठवलय मी त्यात
नेहमी नसेना का पण कधी रमतो मी तुझ्यात

marathi kavita on love- प्रेमखेळतुझ्या मिठीत हरवून जावे
विसरून जावे सारे जग
तुझ्या स्पर्शाने मिटावे ताप
विरून जावी सारी धग
बघ माझ्या डोळ्यात खोलवर
तुझ्या प्रेमाची अधीर पाखरे
तुझाच लळा त्यांना अन
तुझाच त्यावर धाक रे
अशीच असावी घट्ट मिठी 
आणखी वेगळे काय मागणे
तुझ्या सहवासाची ओढ मला
सवयीचे तुझे उनाड वागणे
प्रेमाचा हा खेळ आगळा
नकोच त्याला कसली भाषा 
निस्सीम या देण्याला
नकोच अनाठायी आशा 

marathi kavita premतुला पाहताना सख्या 
स्वप्न माझे बहरून यावे 
फुलपाखरासम बागडताना 
तुझ्या सोबतीत धुंद गावे
स्वप्नातल्या गावात माझ्या 
उभारावी झोपडी इवलीशी 
तुझ्या सोबतीत वाटावी
मजला ती हवीहवीशी 
पांघरली शाल स्वप्नांची
सांधण्यास नवी नाती 
पूर्ण करण्या त्या स्वप्नांना
पेटवू मनाच्या ज्योती marathi kavita prem- पहीली भेटअजुनही आठवते ती ,
तुझी माझी पहीली भेट,
काही क्षणांची का होईना , 
मनाची मनाशी जुळली होती घट्ट गाठ , 
नजरेला तुझ्या नजर दिली होती , 
तेव्हाच कळली होती,
तु दिलेली पापण्यांची साथ  , 
नव्यानेच जाणवली होती 
स्पंदन माझ्या ह्रदयाची , 
भुरळ होती तुझ्या साथ  दिलेल्या लवलवत्या पापण्यांची , 
आजची भेट जरी होती वर्षांनंतरची , 
पहीलीच भेट जणु डोळ्यातल्या त्या कमळांची , 
नजर तुझी सांगत होती उघड झाप ती पाकळ्यांची , 
अनोखी भाषा ती प्रितीची , 
जुन्या त्या प्रेमाच्या रितीची , 
आता श्वासांनाही जाणीव झालेली ,
अनाहत त्या मुक्या भावनांची , 
नजर तुझीही हटत नव्हती ,जाण्याची वेळ झाली होती , 
नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची 
नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची 
marathi kavita for love- साथ तुझीसाथ तुझी असता मला कुणाची न भिती,
धीर मला देण्या तुझा हात हाती... 
साथ तुझी असता वेदना हि दूर जाती,
सोबत तू असता, फिकी वाटती नाती...
साथ तुझी असता धुंद वाटे हा वारा ,
पावसाच्या जणू बरसती ओल्याचिंब धारा...
साथ तुझी असता मनी नाचतो मयूर ,
नसे कुठलीच चिंता न कसले काहूर...
साथ तुझी असता स्पंदने मुग्ध होती,
बोलावया तुजसवे अवचित आतुरती...
साथ तुझी असता शब्द विरून जाती,
लाजेत माझ्या न्हाऊन निघती पाती...
साथ तुझी असता भान हरपून जावे,
स्वप्नास जणू माझ्या नवे अर्थ मिळावे...
 अशी साथ असता जन्मांतरी या,
हवे काय मज मग जगी जागावया या... 
marathi kavita on love-marathi kavita premका क्षितिजाला बिलगण्याचे, स्वप्न धूसरसे वाटते  
का वेगळी आज स्वतः माझी मला मी भासते... 
प्रश्न तेच तसेच अजूनही, तीच उत्तरे शोधते 
ओंजळीत तेच फुलांचे, गुच्छ अजूनही वेचते... 
तीच आशा, तीच मनीषा, तीच कामना मनी जरी  
आज का त्या चांदण्यांचे, कवडसे सलती उरी... 
पाहुनी मी स्वप्न उद्याचे, लाजते अंतरी खरी 
पण मन्मनीची गर्द वादळे, भिरभिरती वाटेवरी... 
मोहरते जरी मन हे माझे, धुंद त्या मृदगंधाने 
का तरीही मी मिटवू पाहते, भावनांची ही स्पंदने...
सूर स्वरांना ताल देण्या, जरी आज ही आतुरते 
मग का अचानक पाठ फिरवूनी, माझे मला मी रोखते... 
सार्थ उभी मी कालसारखीच,अजून बघत स्वप्नांकडे 
हिंदोळ्यावर स्वार तरीही, पाऊल का हे अडखडे...
बालपणीचे बालमनीचे, विश्व जरी उरी मी जपले 
भोवतालीच्या नवलाईने त्यावर, आज जणू धुके पांघरले... 
रंग छटांच्या रंग सागरी, रंगमय हे भाव खरे 
पण त्या रंगांचे रंग रंगुनी, का होई मन बावरे...!!read also,

1500 Best Marathi Suvichar

मराठीतिल सर्वोत्तम बालगीतांचा आणि बडबड गीतांचा  संग्रह  
marathi kavita prem-हुरहूर


पुन्हा एकदा तीच हुरहूर, पुन्हा एकदा तीच चाहूल...
पुन्हा एकदा मनाला तुझ्याच प्रीतीची भूल ...
पुन्हा एकदा नजरेचे तुला शोधण्या धावणे...
पुन्हा तुझ्या भेटीसाठी आतुर होऊ पाहणे..
पुन्हा एकदा नव्याने तुला आठवावे...
पुन्हा तुझ्या सवे बोलण्याचे बहाणे मिळावे...
पुन्हा एकदा तू मला रोखून बघावे...
पुन्हा एकदा मी गोड लाजेत नहावे...
पण... पुन्हा एकदा मिळतील का जुन्याच त्या खुणा..?
अन पुन्हा एकदा पाऊस सरी शमवतील का या उन्हा..?
पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..?
ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..?

marathi kavita on love-मराठी कविता प्रेमनवाकोरा कॅनव्हास समोर ठेवून 
पुन्हा पुन्हा पेन्सिल हाताशी खेळवत 
शून्यात बघणारा मी 
अस्वस्थ... बेचैन होतोय...
ती पाठमोरी 
ओलेत्या अंगाने 
लांबसडक केसांना सुकविते
तिचं एक सुंदरसं 
रेखाटायचंय मला
पण काढायचं कसं 
या संभ्रमावस्थेत 
मी नजरेचं आकाश पसरवून 
बसलोय
चंद्राचा चेहरा दिसावा 
या प्रतिक्षेत ....!!!!


मराठी कविता -पाऊसपाऊस सुरू झाला कि,
मन.. आठवणीत भिजायला 
हळुहळु नाचायला लागते
मग.. स्वतःतच रमते..
पावसाच्या पाकळ्यांना
ओंजळीत झेलत,
हलकेच गोंजारून चेहर्याला 
स्पर्श करुन कवेत घेते..
ओल्या सुंदर बटांतून
गालावर ओघळणार्या 
थेंबांनी, घेतलेल्या मुक्याला 
हलकेच लाजत स्वतःला सावरते..
आठवणीतल्या आठवणींना
आठवुन, मन.. चिंबचिंब भिजल्यावर
प्रेमातल्या त्या अनमोल क्षणांना,
नयनातील डोहात विलीन करते..
वार्यासंगे आलेल्या 
ओल्या मातीच्या गंधात
त्या सुगंधि क्षणांना 
कुरवाळत हरवुन जाते..
शब्दांच्या सुमनांना
काव्य रचनेत गुंफून
प्रेमातील आठवणींंना
कवितेत सजवते..
या प्रवासात जगतांना
ओघळणार्या अश्रुंना
यथेच्छ पावसात भिजवून 
अधीर मनाला, अंती शांत करते..
marathi kavita prem-प्रेम वेडेप्रेम असते वेडे, म्हणतात सारे
चूकीचे नव्हते कधी बोलणारे..
प्रेमाची परिभाषा कधी न जाणली
तुझ्या प्रीतीने हळूवार उमगली..
माझ्या भावनांनी जेव्हा
मलाच प्रश्न विचारले,
गुपित हळूवार त्याचे
असे आता उघडले..
भावना मनाच्या होतात बोलक्या
हसरा चेहरा तुझा आठवतांना..
शब्द राहतात सोबतीला.. तु नसताना
तु असल्यावर.. अबोला येतो त्यांना..
तुझ्या स्वप्नात रमतांना
गातात तीच गाणी..
आपल्या प्रेमाची साक्ष
बनते मग ही,भावनांची वाणी.
मागणे माझे एकच होते 
सहवास मला तिचा हवा होता 
मला तिच्यासाठी पंख नवे हवे होते 
सोबत घेऊन या क्षितिजापलीकडे 
मनातले सगळे किल्मिष दूर करुनि
सोबत दे सखी मला घे जवळी 
आस तुझी मला दे जीवा 
साथ तुझी मला दे जन्मोजन्मी
होकार तुझा येता जीव होतो वेडापिसा
तुझी लाजलेली नजर साथ देईल प्रेमाला माझ्या
तुझ्या गालावरची खळी 
घायाळ करते मला 
अलगद तुझ्या स्पर्शाने 
गदगद झाला जीव माझा


marathi kavita for love-सखे सखे या माझ्या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?
झेप घेण्या उंच आकाशी 
पंख माझे होशील ना?!!धृ!!
हेची मागणे माझे होते 
सहवास मला तुझा हवा होता
क्षितिजापलीकडे सांज ढळता
तुझा हात हाती हवा होता
सखे या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?!!1!!
सोबत तुझी हवी मला
मनातले कीलमिष दूर करूनी
जवळी घे मला जरा
सखे या माझ्या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?!!2!!


मला आशा आहे तुम्हाला ह्या प्रेमावरील कविता आवडल्या marathi kavita prem असतील. 

टिप्पणी पोस्ट करें

0 टिप्पणियां