"

Ticker

6/recent/ticker-posts

पावसावरच्या सुंदर कविता | Rain Poem in marathi | Paus Kavita in Marathi

Paus Kavita in Marathi | पावसावरील मराठी कवितांचा संग्रह

पावसावरच्या सुंदर कविता-paus kavita in marathi वाचायच्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. इथे तुम्हाला नवीन सुंदर पाऊस कविता वाचायला मिळतील.  ह्या लेखाद्वारे सुंदर rain poem in marathi म्हणजे पावसावरील कवितांचा संग्रह उपलब्ध करून दिला आहे. मला आशा आहे तुम्हाला ह्या पाऊस  मराठी कविता paus marathi kavita नक्की आवडतील

Paus-kavita-in-marathi


rain poem in marathi- बघ आलाय श्रावण


ऐक ना ! हा बघ आलाय श्रावण
मुखावर बाळग रिमझीम रुपाची ठेवणं
विसरून जा तुझं भीषण ' आषाढी ' तांडव
मनोहारी सात्विक रूपाला त्या , तुझ्या भेटव.
तारुण्याच्या उंबरठ्यावर
नुकतेच पडले पहिले पाऊल
रिमझिम रिमझिम पाऊसधारा
सख्याच्या संगतीची देती चाहूल
आणि गोड त्या वळणावर
भेटला मज प्रिय साजन
मनमंदिरातील त्याची छबी
भासे मज तो वीर राजन
अवचित मृगधारांची बरसात
संगे सौदामिनीचा कडकडाट
अलगद शिरले कवेत त्याच्या
अनुभवला यौवनाचा थरथराट
झिम्मड पावसात साजनासवे
मनी प्रेमाची पालवी फुटली
भविष्यातील सुरेख गोड स्वप्ने
अलगद अंतरंगी रेखाटलीPaus kavita in marathi- पावसाच्या सरी


सर सर पावसाच्या सरी
देहावर मी या झेली।
झुळ झुळ झुळ झुळ वारा झोंबला।
देह सारा झिंबला।।
शालू पाचू माझा भरजरी
झेलते पदरात पावसाच्या सरी
सर.र्र र्र काटा ग पायात रूतला
वाऱ्या वर पदर फाटला।।
पावसात मोगरा भिजला।
धुंद करितो तो.मला।
अंगणी पडता सडा पावसाचा
बघ मन मयुर थुई थुई नाचला।।


rain poem in marathi- 
टप्पोर शिंपला

क्षीर सागरी टप्पोर शिंपला
शिंपल्या मधे माणिक मोती
प्रेमाच्या चांदण्यात अडकता
गावू लागले गाणे राती
सागर लाटा नाजूक बसता
शिंपले बघा अवचीत फाकले
स्वाती नक्षत्राचे थेंब पडता
नख शिकांत ते हासले लाजले
रातकि ड्या ची झिम्मा फुगडी
स्वर्ग सुखाची अमृत गोडी
चैत्र आंबरी शुक्रतारा
भाषा त्यांची मुकी बोबडीpaus kavita in marathi- पावसाच्या सरी 


सर सर सर सर
पावसाच्या सरी
देहावर मी या झेली।
अचानक ढग जमा झाले आकाषात वरती ।
आणि सोसाटयाचा वारा सुटला झंझावाती ।
तसेच विजेचा कडकडाट झाला किति आणि किती ।
काही क्षणार्धातच पावसाच्या सरी 
घेउन आल्या गारा सोबती ।
आणि मातीचा सुगंध दरवळला अवतीभोवती 
पक्षी मात्र. आपल्या घरटयातच बसुन?
बघु लागले वरतीर खालती ।
जनावरे मात्र आपल्या गोठयाकठे धावु लागले
लावती षर्यती ।
पहिलाच पाउस असल्यामुळे लहान मुले 
ओलीचिंब भिजुन आनंद लुटताहेत 
किती आणि किती।


पाऊस मराठी कविता-एक सारखी संततधार


 नक्षत्रात पडत आहे पावसाची एक सारखी संततधारI
वृक्षवेली मात्र मनमुराद डोलत आहेत होऊनी बहारदारI
पक्षी मात्र आपल्या घरातच बसून नजर टाकत आहे दूरवरI
जनावरे मात्र अक्षरश: 
आपल्या गोठ्यात बसून रवंथ करत आहे वारंवार
सूर्यनारायण तर कित्येक दिवस झाले आहे 
लपून संकेत ढगाआड लांबून देताहेत दूरवरून
नदीकाठच्या लोकांना तर पूर झालाय 
पुरामुळे झालाय कहर आणि कहरच
पावसाची उघडीप उघड होत आहे की नाही 
यामुळे शेतकरी झाला अक्षरश: चिंतातुरpaus kavita in marathi- आवडता महिना श्रावण 


नुकताच सुरू झाला आवडता महिना श्रावण 
पावसाच्या सरी पडत आहेत अधून-मधून 
इंद्रधनुचा दुहेरी गोफ बनून मन जाते भारावून 
अगदी प्रसन्न वाटते हा निसर्गाचा खेळ पाहून 
स्त्रियांचा असतो आवडीचा नागपंचमी सण 
आणि बहीण भावाचे यांच्या अतूट भेटीचा सण असतो रक्षाबंधन 
कित्येक लोक शंभू महादेवाला वाहतात बेलाचे पान 
आणि येतात श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण 
गोकुळ अष्टमीला उपवास करतात तिथे कित्येकजण 
आणि आणि दहीहंडी पाहण्यासाठी लोक राहतात तन-मन-धन 
असा हा आवडता महिना श्रावण rain poem in marathi- मृग नक्षत्र


काही दिवसापूर्वीच सुरु झाले मृग नक्षत्र।
ह्या नक्षत्राचेही संपले प्रथम व द्वितीय सत्र ।
दिवसभर कडक असे ऊन लागते मात्र
मेघराजाला पर्जन्यवृष्टी कर असे पाठविले होते पत्र ।
परंतु मेघराजाने सांगितले भूतलावरील लोकांचे बिघडेल सूत्र ।
पालखी सोहळ्याचा आनंद लुटताहेत कितीतरी लोक मात्र ।
पालखी सोहळयात अखंड हरिनामाचा गजर होऊन 
निश्चितच पाऊस पडेल अहोरात्र ।
सर्वांनी म्हणा ‘रामकृष्णहरी’ हा सोपा मंत्र ।


बदाबदा किती तो कोसळतोयस
रूपावरून तारवटलेला वाटतोयस
' कोसळूदे मनसोक्त ' एव्हढंच होतं म्हटलं
थैमान घालत सुटशील , असं नव्हतं वाटलं
कर ना रे जरासा मनात विचार
मारा सरींचा तुझ्या , होऊदे सुमार
आमची काय असणार , ताकद तुझ्यासमोर
नको रे बाबा होऊस , इतका कठोर
संसार जातायत वाहून लोकांचे
होत्याचे नव्हते होतेय घरांचे
भिंती कोसळतायत कुठे कशावर
आता तरी स्वतःला , घाल रे आवर
कुणाची करणी भोगायचं कुणी
कोण खातंय टाळूवरचं लोणी
तूच आता समजून घे , आम्हाला सावर
किती सहन करायचं रे आणि कुठवर


पाऊस कविता- पावसा पावसा ये ना जरा


पावसा पावसा ये ना जरा
पैसा देईन, तूला मी खरा
सरी ग सरी धावत ये
अंगणात पाणी साचून दे
पावसात आम्ही मजा करू
नाचू ,गावू मस्त भिजू
पाण्या मध्ये होड्यां सोडू
मुला मलींच्या खोड्या काढू
रिमझिम रिमझि पाऊस आला
सूसाट वारा सोबत आला
ढगांचा गडगडाट होऊ लागला
वीजांनीही लखलखाट सूरू केला
चहूकडे मिट्ट अंधार दाटला
मुलांच्या पोटात गोळा आला
घाबरून मुले घरात पळाली
आई बाबांच्या कुशीत शिरली

rain poem in marathi- पाऊस आला


अवखळ रिमझिम
पाऊस आला
चराचराला
भिजवीत सुटला
चिंबचिंब
सृष्टी भिजली
हरिततृणांची
झालर रूजली
डोंगरदऱ्यांतही
झरे प्रसवले
भरभरून पाणी
वाहू लागले
हिरव्या हिरव्या
गर्द शिवारी
नाले ओथंबले
लाल सोनेरी
थेंवाथेबांची
किमया मोठी
पानापानांवर
झळाळले मोती
ईंद्रधनुचे
रंग ऊधळले
नभोमंडपी
तोरण सजले
वीजा वाऱ्यासवे
कडाडल्या
उन पावसाच्या
खेळात रंगल्या
आला रे आला
पाऊस आला
सर्वत्र आनंद
घेऊन आला !!

paus kavita in marathi- पावसाच्या सरींनो


पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला 
उन्हामुळे निसर्ग रम्य करपला 
प्राणीमात्रा असह्य दाह जाहला 
नभात कृष्णमेघांनो या तुम्ही जरा
वीजांसमेत गडगडाट सूरू करा चला 
थंडगार वाऱ्यासह आगमन करा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला 
रात्रीही नसे आताशी गारवा 
थंडाव्यास जीव हा वेडावला 
बरसूनी चरास चिंब भिजवा जरा
इंद्रधनू तृष्ण तृप्त पाहूया चला 
संतत धार होवूनी बरसत राहा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला 
वाऱ्यालाही साथीने तू आण पावसा
मातीलाही रंग सुगंध दे पावसा 
मुसळधार होवूनी कोसळा जरा
निसर्गास हिरवी छटा द्या तुम्ही चला
पावसाचा जोर सतत राहू दे जरा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला


paus kavita in marathi-मनातला पाऊस


क्षितिजाकाठी तो दिसता
खिडकीशी मीही थबकतो
निळ्याशार अंबरी जमल्या
घन निळ्या मित्रांंना पाहतो ...........
पावसाच्या दूतांना पाहुनी
या या मित्र हो ,मी विनवितो
घेत नाही मग आढेवेढे तो
आणि मनमुराद कोसळतो ..........||
मित्र असे मोकळे असावे
आत-बाहेर काही नसावे
देणे पावसापरी जमावे
जीवनी सुख होऊनी यावे ......||


मनातला पाऊस मनातच बरा
बाहेर आला तर डोळे ओले होतील
पुन्हा एकदा मग विनाकारण ते
जुन्या आठवणींना उजाळा देतील
शांत जरी तो बाहेरून साऱ्यासाठी
आतल्या आत आजही तो बरसतो 
वाट पाहतो भेटीसाठी तो अजुनही 
सारे काही मनी साठवून तरसतो
मनातील त्या पावसाला आवडते
चिंबचिंब भिजवायला हे तनमन 
ऐकता त्याचे दुःख होतात भावूक
ढाळून दोन अश्रू सोडतात सारेजण
म्हणून मनातील तो पाऊस आजही
तसाच अव्यक्त कोपऱ्यात दडलाय 
घेईल समजून कोणीतरी या आशेवर
तो आज धो धो कोसळुन पडलाय
त्याला न ठाव काय आता होणार आहे
तरीही तो साऱ्यांच्या मनी आनंद भरतो 
कुणी होवो अथवा न होवो आपले तरीही
केल्या उपकारांची तो जाणीव धरतो

rain poem in marathi- फक्त पावसातच होता येतं चिंब


आंघोळ करताना
रोज भिजलं तरी
फक्त पावसातच होता येतं चिंब
पुढचं काही सुचत नाही
टिंब टिंब टिंब
टिंब टिंब टिंब टीबीक
आवाज थेंबा थेंबाचा
खरच हा आवाजही
मज वाटतो हौसेचा
वेगळाच तोरा
दरवर्षी पावसाचा
जणू पडतो असा
की असावा नवसाचा


paus kavita in marathi- कधी रप रप कधी झप झप


कधी रप रप कधी झप झप
कधी वरंधार कधी चिर चिर
कधी ढग फुटी तर कधी गारपीट
सारं कस बेभरोशाच
तरी पण अतूट प्रेमाचं
अन मोठ्या जोमाचं
कोणत्याही प्रकारात
चिंब चिंब करणार
आणि मोठं सुख देणार....!!!


सोसाट्याचा वारा सुटला
काळे ढग नभी आले
विजांचा कडकडाट कडाडला
पाऊस धरतीवर पडला
घराचे छप्पर उडाले
निवारा जलमय झाला
बाया माणसांची धावपळ
जीव घराकडे लागला
रान सारे बहरले
पाऊसाच्या सुंदर सरीने
पाणी अंगणी साचले
घेतला आनंद गावाने
शिळ्या भाकरीची चव
लागे पोटाला चवदार
घरी असे विश्व दारिद्रय
समाधानी होता परिवार
मधुनच वीज गायब होई
दिव्याचा प्रकाश घरभर
कधी मेणबत्ती, कधी घासलेटचा दिवा
अभ्यास करी रात्रभर
नव्हत्या तेव्हढ्या सोई
तरी सारे सुखी होते
आता सर्व काही मिळते
तरी निराशाचे डोंगर दिसते


पाऊस कविता मराठी -
चांदण्यांचा पाऊस


चांदण्यांचा पाऊस पडताना
मी प्रत्यक्ष पाहिलं
त्याच क्षणी मी पहिलं
काव्य पुष्प वाहिलं
अशी असंख्य काव्य पुष्पे
गुंफून एक काव्यमाला
चंद्राच्या प्रेमा पोटी
मुक्त हस्ते चंद्रास आज अर्पिली
चन्द्र सुद्धा नम्र इतुका की
भाराने खाली झुकला
आणि चांदण्यांच्या सरीसह
तो अलगद खाली आला
इतका खाली आला की
माझा अपमान झाला
कारण त्याने नेमका
एक एप्रिलचाच मुहूर्त गाठला
चिंब भिजताना बरे वाटले
चांदण्यातही तो चंद्र सुखावला
एप्रिल फुल्ल म्हणून
हलकेच जागवून निघून गेला
आजही एक एप्रिलला
तो नियमित पणे चांदण्याच्या
पावसा सवे न चुकता येतो
आणि एप्रिक फुल्ल म्हणून जातो....!!  
आशा आहे तुम्हाला ह्या paus kavita in marathi आवडल्या असतील. तुमच्याकडे काही पाऊस कविता असतील तर कमेंट मध्ये लिहा आम्ही ह्या ब्लॉग वर नक्की प्रकाशित करू तसेच ह्या ब्लॉग वरील मराठी सुविचार, बोधकथा, बालगीते वाचायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करें

0 टिप्पणियां